मातंग समाजाच्या विकासाचा मार्ग

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानं हा धोरणात्मक निर्णय घेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करण्यास मान्यता दिली आहे.

38

बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना हि अनुसूचित जाती समूहातील मातंग समाजासह इतर जाती समूहाची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानं हा धोरणात्मक निर्णय घेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करण्यास मान्यता दिली आहे. याद्वारे मातंग समाजासह तत्सम यातील 12 उपजातींच्या गरजू, घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना आर्थिक स्वयरोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २०२४ – २०२५ च्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये शासनाकडून महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) धर्तीवर अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश असणार्या मातंग समाजाच्या विकासासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापना करण्यास राज्य सरकारने दि. १६ जुलै २०२४ रोजी शासन निर्णय जाहीर करून मंजुरी दिली आहे. सामाजिक न्याय विभागाकडून तसा शासन निर्णयहि जाहीर करण्यात आला आहे. या संस्थेच्या स्थापनेमुळे अनुसूचित जातीअंतर्गत मातंग व तत्सम जाती (मांग, मातंग, मिनिमादिग,दखनी – मांग, मांग – म्हशी, मदारी, गारुडी, मादगी, मादिगा) आदि समाजाच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश असणाऱ्या मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास होण्यासाठी व समाजातील व्यक्तींना योग्य प्रमाणात लाभ पोहचवण्यासाठी क्रांतीगुरू लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग स्थापन करण्यात आला आहे. आयोगाने दिलेल्या शिफारसीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याची शिफारस आहे.

स्थापनेचा उद्देश : अनुचूचित जाती आणि विशेषत: मातंग व अन्य १२ उपजाती समाजातील युवकांना शिक्षण,उच्चशिक्षण,प्रशिक्षण,संशोधन,कौशल्य विकास,रोजगार-स्वयंरोजगार प्रशिक्षण,स्टार्ट अप, रोजगारनिर्मिती आदि योजना राबवल्या जाणार आहे. ग्रामीण भागातील समाजातील शेतमजूर, शेतकरी, कामगार, सफाई कामगार यांच्या मुलांना मुख्यप्रवाहात आणण्याकारिता या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणून समता विचारपीठ चालू ठेवणे आणि विकास करणे.

विविध क्षेत्रामध्ये प्रचलित असलेली “सामाजिक समता” या विषयी संशोधन करून सामाजिक समता तत्वप्रणाली समाजामध्ये जास्तीत जास्त परिणामकारक कशी होईल या बाबत संशोधन करणे.

सामाजिक समता या विषयाशी निगडीत असे व्यावसायिक ज्ञान तसेच अशा विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी तरुण व्यक्तींना सुविधा उपलब्ध करून देणे व त्यांच्या ज्ञानामध्ये समाजशात्राच्या दृष्टीकोनातून सर्वांगीण वाढ होईल असे प्रशिक्षण देणे.

समाजातील विविध स्तरामध्ये “सामाजिक समता” या तत्वप्रणालीवर आधारित सहकाराच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि त्याबाबत अधिक संशोधन करणे व त्यानुसार अनुभव, विचार व परिवर्तन करणे बाबत समाजामध्ये अधिक चांगली जाणीव निर्माण करून “सामाजिक समता” या कार्यास उचलून धरणे.

सुकर शिक्षणक्रम, संमेलन, व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद असे इतर कार्यक्रम आयोजित करण्याचे काम हाती घेणे.

पुस्तके, नियतकालिके आणि संशोधनात्मक, निबंध प्रकाशित करणे.

मान्यताप्राप्त संस्था आणि संघटना यांच्याशी सहकार्य करणे तसेच त्यांच्याशी समन्वय साधणे आणि त्यांना त्यांच्या कार्यामध्ये प्रोत्साहन देणे.

शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्टार्ट-अप, रोजगारनिर्मिती, प्रचार, प्रसार, प्रसिध्दी, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक विकास करणे व त्याच्याशी निगडीत योजना राबविणे.

शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्टार्ट-अप, रोजगारनिर्मिती, प्रचार, प्रसार, प्रसिध्दी, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक विकास करणे व त्याच्याशी निगडीत योजना राबविणे.

लोकगीते, लोकसंस्कृती, लोककला संदर्भात संशोधन, प्रशिक्षण, प्रचार, प्रसिध्दी करणे.

परंपरागत व्यवसायांना चालना देणे, आर्थिक मदत करणे.

कला, कौशल्य यांचे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद भरविणे व सहभागी होणे

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य प्रसिध्द करणे व अप्रकाशित साहित्य प्रसिध्द करणे आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये भाषांतर करणे.

Comments are closed.